जिल्हा

डोंबिवलीच्या अदिती सकपाळने घेतला १६ लघुग्रहांचा शोध

डोंबिवलीच्या अदिती सकपाळने घेतला १६ लघुग्रहांचा शोध
डोंबिवलीच्या अदिती सकपाळने घेतला १६ लघुग्रहांचा शोध फोटो: ठाणे वैभव

नासाच्या संकेतस्थळावर तीन संभाव्य लघुग्रहांची नोंद

डोंबिवली: डोंबिवलीतील स.वा. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अदिती सकपाळ हिने अवकाश विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अदितीने आतापर्यंत तब्बल १६ लघुग्रहांचा शोध घेतला आहे.

अदितीच्या या संशोधनाची दखल अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने घेतली असून, ‘२०२४ WA९५’, ‘२०२४ WQ३९’ आणि ‘२०२४ FO७’ या तीन संभाव्य लघुग्रहांची नोंद नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे अदितीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिळकनगर विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असलेली अदिती आठवी इयत्तेपासून ताऱ्यांचे निरीक्षण करत होती. या आवडीचे रूपांतर तिने संशोधनात केले. पुणे येथील स्पेसक्रॅट्स विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेत अव्वल स्थान मिळवत तिची ‘स्पेसक्रॅट अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे.

डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत अंतराळ प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही अदिती पार पाडत आहे. त्यामुळे स्वतः संशोधन करण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांमध्येही अवकाश विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम ती करत आहे.

दरम्यान, लघुग्रह संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अदिती सकपाळ हिने आशिष शेलार यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी शेलार यांनी अदितीच्या कामगिरीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीप्रसंगी अदितीची आई श्रद्धा सकपाळ, वडील प्रवीण सकपाळ, डॉ. युवराज लांबोळे, स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे तसेच ठाणे जिल्हा इनोव्हेशन डायरेक्टर किशोर चव्हाण उपस्थित होते.

अदितीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे डोंबिवलीतील विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची नवी प्रेरणा निर्माण झाली असून, तिच्या पुढील संशोधनासाठी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475